कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी
कोल्हापूर दि.२५ :- कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. कणेरी मठात सध्या आंतरराष्ट्रीय ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ सुरू आहे. येथे काही गायींचा संशयास्पदरित्या झालेला मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे.
गुणवत्तापूर्ण पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
भाकड आणि भटक्या गायींनाही सांभाळणारी आदर्श गोशाळा येथे आहे. असे असतांना कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना अचानक पुढे येऊन या गायींच्या मृत्यू संदर्भात कणेरी मठावर आरोप करत आहेत. तेथे गायींचा झालेला आकस्मिक मृत्यू हे एक षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे समितीने म्हटले आहे.
Bigg Boss 16 फेम शिव ठाकरे शिवतीर्थवर; ‘राज’भेटीचे कारण गुलदस्त्यात
जे साम्यवादी आणि समाजवादी गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध करतात आणि शेतकर्यांच्या भाकड गायी कत्तलखान्यात जाव्यात यासाठी उघड भूमिका घेतात. साम्यवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीने अनेक गायी विकल्या, तसेच अनेक गायींच्या पोटात चोळीचे खण आणि प्लास्टिक पिशव्या सापडल्या, त्या वेळी कुठल्या बिळात लपून होते ? आज मात्र या साम्यवादी आणि समाजवाद्यांना अचानक गोप्रेमाचा उमाळा का आला ? यामुळेच त्यांनी घेतलेली भूमिका ही दुटप्पीपणाची आहे, हेच यातून दिसून येते, असा आरोपही समितीने केला आहे.