Bigg Boss 16 फेम शिव ठाकरे शिवतीर्थवर; ‘राज’भेटीचे कारण गुलदस्त्यात
मुंबई दि.२५ :- बिग बॉस १६ चा उपविजेता शिव ठाकरेने नुकतीच शनिवारी (आज) शिवतीर्थावर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवने राज ठाकरेंची राजकीय कारणास्तव भेट घेतल्याची चर्चा आता रंगतेय. यावेळी शिवसोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते.
नवाब मलिक यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर पुढील आठवडय़ापासून सुनावणी
आता शिवने राज ठाकरेंची राजकीय कारणास्तव भेट घेतली की अन्य कोणते कारण या भेटीमागे आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट ही राजकीय भेट होती का? असा प्रश्न यावेळी माध्यमांनी शिव ठाकरेला विचारला.
‘भगूर ते अंदमान’ या विषयावर चित्र प्रदर्शन
त्यावर बोलताना शिव म्हणाला, “मराठी माणूस जेव्हा पुढे पाऊल ठाकतो तेव्हा राज साहेब शाब्बासकी देतात. त्यांनी अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते. त्यांनी बिग बॉसबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामागे कोणतेही राजकीय कारण नव्हते,” असे शिवने सांगितले.