‘भगूर ते अंदमान’ या विषयावर चित्र प्रदर्शन
मुंबई दि.२५ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘अनबिलिव्हेबल सावरकर’ भगूर ते अंदमान या विषयावरील योगेंद्र आर. पाटील यांचे चित्रप्रदर्शन सुरू झाले आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावबदलास केंद्र शासनाची मंजुरी
स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात असिलता सावरकर – राजे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी चित्रप्रदर्शानाचे उदघाटन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन शेपाल, ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे प्रदर्शन सर्वांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथे भरविण्यात आले आहे.