स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनानिमित्त उद्या ‘शोध हा नवा -शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम
मुंबई दि.२५ :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात ‘शोध हा नवा –शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन जेष्ठ कथ्थक नृत्यांगना डॉ. रुपाली देसाई यांचे आहे.
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
कार्यक्रमात सावरकरांच्या अजरामर गीतांबरोबरच त्यांनी लिहिलेली लावणी, पोवाडा, फटका, त्यांच्या नाटकातील प्रवेश, त्यांची छायाचित्रे, त्यांच्या भाषणाची झलक, सावरकर चित्रपटातील दृश्य या साऱ्या माध्यमातून सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा पहिला प्रयोग २७ मे २००७ रोजी सादर झाला होता