मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.२५ :- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (२६ फेब्रुवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर, ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल / बेलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही रद्द करण्यात येणार आहेत.
गुणवत्तापूर्ण पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. या ब्लॉकदरम्यान अप – डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत.