ठळक बातम्या

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (२७ फेब्रुवारी) सुरू

मुंबई दि.२६ :- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (२७ फेब्रुवारी) सुरू होत आहे.‌ राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीतील हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.‌ हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनानिमित्त उद्या ‘शोध हा नवा -शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम

निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अर्थात मुख्यमंत्री शिंदे गटाला देण्यात आले आहे.‌ त्याचे पडसाद तसेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाचेही पडसाद अधिवेशनात उमटतील. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

आगामी बृहन्मुंबई महापालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, २०२४ मध्ये होणारी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षांकडून राज्यातील मतदारांना लाभ देण्यासाठी काही नवे प्रकल्प, योजना किंवा काही घोषणा केली जाईल का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आणखी किती आमदार, नगरसेवक यांचा मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *