‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेतर्फे ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’चे आयोजन
मुंबई दि.२४ :- ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेतर्फे येत्या २५ ते २६ फेब्रुवारी या दिवशी ठाणे येथे ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवाचे चे उदघाटन होणार आहे.
विधानभवनात मराठी साहित्याची ज्ञानयात्रा! – ज्ञानपीठ सन्मानित साहित्यकृतींचे अभिवाचन
दोन दिवसांच्या या महोत्सवात पाळीव प्राण्यांसाठी विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीरासह श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, फॅशन शो आणि ट्विन वाॅक असे कार्यक्रमही होणार आहेत.
‘भाग्य दिले तू मला’- राज आणि कावेरी यांचा लग्नसोहळा
ठाणेकरांना महोत्सवात श्वान, मांजर, पक्षी आणि माशांच्या विविध दुर्मिळ प्रजाती पाहायला मिळणार आहेत. घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागातील गार्डन इस्टेटजवळील मैदानात रोजी हा महोत्सव होणार आहे.