विधानभवनात मराठी साहित्याची ज्ञानयात्रा! – ज्ञानपीठ सन्मानित साहित्यकृतींचे अभिवाचन
मुंबई दि.२५ :- कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाच्या ‘मराठी साहित्याची ज्ञानयात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘भाग्य दिले तू मला’- राज आणि कावेरी यांचा लग्नसोहळा
विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित हा कार्यक्रम सोमवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन करण्यात येणार आहे.
मोठागाव-माणकोली खाडी पूल (डोंबिवली पश्चिम) आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आदि यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुश्री फडणीस करणार असून कार्यक्रमाची संहिता उत्तरा मोने यांची आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे अभिवाचन अभिनेते डॉ. गिरीश ओक, लीना भागवत तर नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे कविता गायन करणार आहेत.