ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन
मुंबई दि.२३ :- ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना, शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासक आणि नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापिका डॉ. कनक रेळे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू आणि विवाहित नात असा परिवार आहे.
आग लागण्याच्या घटनांमुळे ४०० सीएनजी बस बंद करण्याचा निर्णय
भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. ‘मोहिनीअट्टम’ नृत्य प्रकारात पारंगत असलेल्या डॉ. रेळे यांनी नृत्यशास्त्राच्या अध्ययनासाठी स्वतंत्र महाविद्यालय असावे, या ध्यासाने प्रेरित होऊन १९६६ मध्ये नालंदा नृत्य संशोधन केंद्राची स्थापना केली.
पूर्व मुक्तमार्ग ते ग्रँटरोड उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरु
डॉ. रेळे यांनी आपले जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार व संशोधनासाठी समर्पित केले. ‘नालंदा नृत्य आणि संशोधन केंद्र’ आणि ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडविले.