मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी ‘फिल्मबाजार’ पोर्टल तयार करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि.२३ :- मराठी चित्रपट, मालिका, ओटीटीसह विविध कार्यक्रम यांच्या समन्वयासाठी राज्य सरकारने ‘फिल्मबाजार’ पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन
फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत महेश कोठारे, स्वप्निल जोशी, संदीप घुगे, केतन मारु यांचा समावेश आहे.
आग लागण्याच्या घटनांमुळे ४०० सीएनजी बस बंद करण्याचा निर्णय
मराठी चित्रपट, दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवरील मराठी मालिका, कार्यक्रम तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीकरिता पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि वित्त पुरवठादार यांना एका व्यासपीठावर आणून एकमेंकाशी समन्वय साधणे, सल्ला देणे हे काम समिती करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.