वाहतूक दळणवळण

आग लागण्याच्या घटनांमुळे ४०० सीएनजी बस बंद करण्याचा निर्णय

मुंबई दि.२३ :- तीन ‘सीएनजी’ बसना आग लागण्याच्या घटनांमुळे ४०० सीएनजी बस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी सीएनजी बस आगीत जळून खाक झाली.

पूर्व मुक्तमार्ग ते ग्रँटरोड उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरु

मे. मातेश्वरी कंपनीद्वारे चालविण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या ‘सीएनजी’वर चालणाऱ्या दोन बसगाडय़ांना आग लागण्याच्या घटना या आधीही घडल्या होत्या. बेस्ट बस क्रमांक ४१५ अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे आली तेव्हा ती प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती.

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात आठ मजली नवी न्यायालयीन इमारत

शेवटचा थांबा असल्याने सर्व प्रवासी उतरल्यानंतर संध्याकाळी बसने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. २० ते २५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत बस आगीत खाक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *