जन्मतः अत्यंत गंभीर परिस्थिती असलेल्या बाळावर परिणामकारक व प्रभावी उपचार
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रुग्णालयातील यशोगाथा
मुंबई दि.२३ :- जन्मतः अत्यंत गंभीर परिस्थिती असलेल्या बाळावर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रुग्णालयात
परिणामकारक आणि प्रभावी उपचार करण्यात आले. आता बाळाची तब्येत उत्तम आहे. कांदिवली पश्चिम परिसरातील बृहन्मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रुग्णालयात गेल्या महिन्यात एका महिलेने मुलीला जन्म दिला.
मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी ‘फिल्मबाजार’ पोर्टल तयार करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
जन्मानंतर काही तासातच या नवजात बाळाचे शरीर निळे पडू लागले आणि बाळाचा श्वासोच्छवास अनियमित झाला. या बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला तातडीने अतिदक्षता कक्षात दाखल केले. महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सामग्रीच्या सहाय्याने अत्यंत तातडीने आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले.
ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन
या उपचारांना नवजात बाळाने चांगला प्रतिसाद दिला. डॉ. आंबेडकर रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने नवजात बाळाला उपचार सुरू केले. सुमारे महिन्याभरानंतर आता बाळाची तब्येत उत्तम असल्याचे रुग्णालयातील डॉ. अजय गुप्ता यांनी कळविले आहे.