‘एमआयएम’ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत
मुंबई दि.२२ :- एमआयएम (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लीमन) पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन येत्या२५ आणि २६ फेब्रुवारी रोजी महापे- नवी मुंबई आणि मुंबईत आयोजित करण्यात आले आहे.
जन्मतः अत्यंत गंभीर परिस्थिती असलेल्या बाळावर परिणामकारक व प्रभावी उपचार
२५ फेब्रुवारी या दिवशी पक्षाचे नवी मुंबई, महापे येथे अधिवेशन होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मुंब्रा येथे जाहीर सभा होणार आहे. पहिल्या दिवशी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, प्रवक्ते, प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार आहेत.
मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी ‘फिल्मबाजार’ पोर्टल तयार करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
२६ फेब्रुवारी रोजी चेंबूरमध्ये अधिवेशन होणार असून अधिवेशनात पक्षाचे देशभरातील लोकप्रतिनिधी, सर्व जिल्हाध्यक्ष, प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संध्याकाळी मालाड, मालवणी येथे जाहीर सभा होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी दोन्ही दिवशी मार्गदर्शन करणार आहेत.