पूर्व मुक्तमार्ग ते ग्रँटरोड उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरु
साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल
मुंबई दि.२३ :- मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनातर्फे लवकरच तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. ५ हजार ५६० मीटर लांबीच्या या पुलासाठीची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे.
ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात आठ मजली नवी न्यायालयीन इमारत
निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ४२ महिन्यांचा कालावधी अपेक्षितआहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे. सदर प्रस्तावित उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणा-या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे.
शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’! – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० मिनिटे ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो. उन्नत-मार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर या अंतरासाठी फक्त ६ ते ७ मिनिटे लागणार आहेत. तसेच सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महापालिकेला रुपये ६६२.४२ कोटी इतका खर्च अंदाजित आहे,