मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याची ससून डॉक येथे सांगता
मुंबई दि.२२ :- आगामी काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगांबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग आणले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले.
पक्षाचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड
मच्छिमारांसाठी मत्स्यव्यवसाय विषयक कल्याणकारी योजनांच्या लाभासंबंधी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सागर परिक्रमेचा सांगता समारंभ (तृतीय चरण) मुंबई शहर जिल्हयातील नवीन भाऊचा धक्का येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
महाराष्ट्रातील नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर,मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार महेश बालदी, केंद्रीय मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव श्री. जे एन स्वेन, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे यांच्यासह ससून डॉक येथील स्थानिक मच्छिमार मोठया संख्येने उपस्थित होते.
कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत- दीपक केसरकर
‘एनडीआरएफ’ मार्फत मच्छिमारांचे नुकसान झाल्यास त्यांना देण्यात येणारी मदत कमी असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे मदतीबाबतचे निकष बदलण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे रुपाला यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक
मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. मत्स्य संपदा योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या आणि इतर योजनांचा फायदा महाराष्ट्रातील मच्छिमारांनी घ्यावा, असे आवाहनही रुपाला यांनी केले.
दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत
काही दिवसांपूर्वी दहा मच्छीमारांच्या जाळीचे नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या दहा मच्छिमारांना जाळीसाठी ५४ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील, अशी घोषणा केली.