सोन्याच्या तस्करीविरोधातील मोहिमेत १०१ किलो सोने जप्त, १० जणांना अटक
मुंबई दि.२२ :- सोन्याच्या तस्करीविरोधातील एका विशेष मोहिमेत महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) एकूण १०१ किलो सोने व एक कोटी ३७ लाखांचे भारतीय व परदेशी चलन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ५१ कोटी रुपये इतकी आहे.
मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या प्रकरणी सुदान देशाच्या नागरिकांसह एकूण दहा जणांना अटक करण्यात आली असून मुंबईत कुलाबा आणि झवेरी बाजार या चार ठिकाणांसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
पक्षाचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड
हे आरोपी भारत व नेपाळ सीमेवरून सोन्याची तस्करी करत होते. तस्करीचे सोने रेल्वेने किंवा बसद्वारे मुंबईत आणले जायचे. ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पाटणा रेल्वे स्थानकावरून सुदान देशाच्या नागरिकांना ताब्यात घेतले.