पक्षाचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारदेण्याचा ठराव मंजूर
मुंबई दि.२२ :-शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षाचे प्रमुख नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
मंत्रालयातील शिवसेना कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून ताब्यात
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यानंतर मुंबईत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत
मूळ शिवसेनेचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक ताज प्रेसिडन्सिमध्ये पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, रामदास कदम, प्रतापराव जाधव, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, यांच्यासह शिवसेनेचे आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटांच्या नेत्यांचे ‘ट्विटर’वर ‘धनुष्यबाण’ हे प्रोफाईल पिक्चर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी मांडला आणि या बैठकीत तो मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचा पाठपुरावा केंद्राकडे केला जाईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
सावरकर आर्चरी अकादमीच्या तिरंजादांना बोरिवली क्रीडा महोत्सवात १६ सुवर्ण पदके
शिवसेना पक्षाच्या घटनेवर ही यावेळी चर्चा करण्यात आली. सिद्धेश रामदास कदम यांची शिवसेना सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. बैठकीत पक्षाच्या शिस्तभंग समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली.