ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात आठ मजली नवी न्यायालयीन इमारत
ठाणे दि.२२ :- ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात आठ मजली न्यायालयीन इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकामासाठीच्या आवश्यक खर्चाच्या प्रस्तावास राज्य शासनानेही मंजूरी दिली आहे.
पॉंडीचेरी , तमाशा लाईव्ह, सहेला रे प्लॅनेट मराठी ओटीटी’वर
इमारत बांधकामांसह इतर सेवा-सुविधांसाठी सुमारे १७२ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ठाणे न्यायालयाची इमारत जुनी झाली असून तिच्या पूर्नबांधणीचा निर्णय २०१७ मध्ये राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने घेतला होता.
धारावीतील कमला नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत साठ झोपड्या जळून खाक
मार्च २०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या पत्रानुसार न्यायालयाच्या आवारात आठ मजली इमारतीच्या बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यास नुकतीच मंजुरी मिळाली.