शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’! – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई दि.२२ :- गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होणार आहे.
पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा ‘आनंदाचा शिधा’ गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच अशा सवलतीच्या दरात दिला जाणार आहे. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा देण्यात येणार आहे.