ठळक बातम्या

दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार

मुंबई दि.२१ :- ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांची कामे आजपासून सुरू झाली असून ही कामे येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.‌ त्यामुळे या काळात शहरातील वेगवेगळ्या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार असून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

२१ फेब्रुवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तास, २३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत १२ तास आणि शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते सकाळी ९ असे एकूण ३६ तास घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रह्मांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझादनगर, पातलीपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, विजयनगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागांमध्ये पाणी बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या तयारीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला ‘प्रोमो-रन’

२१ फेब्रुवारी, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते सकाळी ९ या वेळेत गांधीनगर, सुरकरपाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतूपार्क, रुस्तोमजी, कळवा, खारेगाव, आतकोनेश्वरनगर, रघुकुल, मुंब्र्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर २२, २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ असे सुमारे ३६ तास सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन ईटरनिटी या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

मंत्रालयातील शिवसेना कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून ताब्यात

गुरुवारी सकाळी ९ ते शुक्रवार सकाळी ९ यावेळेत इंदिरानगर, लोकमान्यनगर, किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, रामनगर, रूपादेवीपाडा, सावरकरनगर, डवलेनगर, परेरानगर, कैलासनगर, भटवाडी या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, तसेच पुरेशी साठवणूक करावी, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *