नाव आणि निवडणूक चिन्ह गेले म्हणून शिवसेना संपली नाही- उद्धव ठाकरे
मुंबई दि.१८ :- पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गेले म्हणजे शिवसेना संपली असे कुणीही समजू नये, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे बोलत होते.
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून शपथ घेतली
आज महाशिवरात्र असून आपले शिवधनुष्य चोरीला गेले आहे. शिवधनुष्य निवडणूक चिन्ह चोरणा-यांना आम्ही धडा शिकवू, असे आव्हानही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिले.