मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटांच्या नेत्यांचे ‘ट्विटर’वर ‘धनुष्यबाण’ हे प्रोफाईल पिक्चर
मुंबई दि.१८ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटांच्या नेत्यांनी ‘ट्विटर’ या समाजमाध्यमावरील आपले प्रोफाईल पिक्चर तातडीने बदलले आहे. आता यांनी ‘धनुष्यबाण’ हे प्रोफाईल पिक्चर ठेवले आहे.
नाव आणि निवडणूक चिन्ह गेले म्हणून शिवसेना संपली नाही- उद्धव ठाकरे
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला दिले आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिवसनेने गमावले. काल हा निर्णय देण्यात आला.
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून शपथ घेतली
या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे आणि अन्य नेत्यांनी हा बदल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनीही ‘ट्विटर’ या समाज माध्यमावर आपले प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.