साहित्य- सांस्कृतिक

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाजपतर्फे २२७ प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई दि.१७ :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त १९ फेब्रुवारीरोजी भारतीय जनता पक्षातर्फे मुंबईत शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप मुंबईचे अध्यक्ष, आमदार ॲड आशिष शेलार यानी दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासाठी राजभवन येथे निरोप समारंभाचे आयोजन

मुंबईत भाजपतर्फे २२७ प्रभागांमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या विविध आघाड्या व मोर्चे मिळून ३४६ ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महाजयघोष केला जाणार आहे.

सावरकर आर्चरी अकादमीच्या तिरंजादांना बोरिवली क्रीडा महोत्सवात १६ सुवर्ण पदके

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावे, चित्र प्रदर्शन, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, शस्त्र प्रदर्शन, स्पर्धा, मिरवणूक असे विविध कार्यक्रम होणार असल्याचेहीही शेलार यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *