स्मार्ट तंत्रज्ञानावरील दहा लाख मीटर बेस्ट उपक्रमाकडून बसविण्यात येणार
मुंबई दि.१७ :- ‘बेस्ट’च्या वीज वितरण क्षेत्रात दहा लाख वीज ग्राहकांचे मीटर येत्या काळात स्मार्ट तंत्रज्ञानावर कार्यान्वित होणार आहेत. बेस्ट उपक्रमाकडून मुंबईतील वीज वितरण क्षेत्रात मीटर बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाजपतर्फे २२७ प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन
येत्या मार्च महिन्यापासून प्रभागनिहाय कामाला सुरुवात होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईतील निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक तसेच झोपडपट्टी भागातील ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार असून बेस्ट आणि अदाणी यांच्यातील करारानुसार सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये या कामासाठी उपक्रमाकडून देण्यात येणार आहेत.