ठळक बातम्या

नौदलातर्फे राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना

उद्या नव्या राज्यपालांचा शपथविधी

मुंबई दि.१७ :-  मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. दरम्यान महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस उद्या (शनिवारी) दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनानिमित्त २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. विमानतळाकडे प्रस्थान करण्यापुर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी प्रभादेवी येथे श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *