ठळक बातम्या

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनानिमित्त २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई दि.१७ :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पणदिनानिमित्त (२६ फेब्रुवारी) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी अकरा वाजता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ‘अनबिलिव्हेबल सावरकर’ या विषयावरील योगेंद्र आर. पाटील यांच्या चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद् घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर- राजे यांच्या हस्ते होणार आहे.

स्मार्ट तंत्रज्ञानावरील दहा लाख मीटर बेस्ट उपक्रमाकडून बसविण्यात येणार

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन शेपाल, ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन आदि मान्यवर मंडळींही उपस्थित असतील.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाजपतर्फे २२७ प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन

शनिवार २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘माझी जन्मठेप’ वर आधारित नाट्याविष्कार सादर होणार आहे. हे अभिवाचन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ‘माझी जन्मठेप’च्या अभिवाचनाच्या रंगमंचीय अविष्काराचा हा पहिलाच प्रयोग आहे. याची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची असून दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांचे आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासाठी राजभवन येथे निरोप समारंभाचे आयोजन

अभिवाचनात अभिजीत धोत्रे, अमृता कुलकर्णी, नवसाजी कुडव, जान्हवी दरेकर, शंतनू अंबाडेकर, मुग्धा गाडगीळ- बोपर्डीकर, कुंतक गायधनी हे कलाकार सहभागी होणार आहेत. रविवार २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या ५७ व्या आत्मार्पणाच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्य आणि कार्यकर्तृत्वावर आधारित ‘शतजन्म शोधताना’ हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सादर होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र मिलटरी स्कूल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांची ही निर्मिती आहे. संस्कृती कला मंदिर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *