साहित्य- सांस्कृतिक

मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना तर श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार ‘ग्रंथाली’ला

मुंबई दि.१६ :- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.‌ मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी हे पुरस्कार जाहीर केले. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर तर श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनास जाहीर झाला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी खासगी विकासकांची यादी तयार

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप रोख पाच लाख रुपये, समानचिन्ह आणि मानपत्र तर श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार रोख तीन लाख रुपये, समानचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाचा आहे. डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला असून डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे.

समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी मार्च अखेरपर्यंत निविदा काढणार

दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रोख दोन लाख रुपये, समानचिन्ह, मानपत्र असे आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी द. ता. भोसले यांची निवड झाली आहे. तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी दोन लाख रुपये रोख, समानचिन्ह व मानपत्र असे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *