झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी खासगी विकासकांची यादी तयार
मुंबई दि.१६ :- मुंबईतील रखडलेल्या ५१७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ९० खासगी विकासकांची यादी तयार केली आहे. या बाबततचा प्रस्ताव प्राधिकरणाने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे.
रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाई, म्हशींच्या अटकावासाठी कुंपणाचा अडथळा
या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून विकासकांची नियुक्ती करून प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. यासाठी विकासकांडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी मार्च अखेरपर्यंत निविदा काढणार
प्राधिकरणाकडे विकासकांनी सादर केलेल्या प्रस्तावांची छाननी करून वर्गवारीनुसार ९० विकासकांची ही यादी तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेल्या ५१७ झोपु योजना मार्गी लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. या निर्णयाची प्रत्ऐ अंमलबजावणी झाल्यानंतर सुमारे ५० हजार झोपडपट्टीवासियांना दिलासा मिळणार आहे.