सुसंस्कृत आणि जातीविरहित भारत निर्माण करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी बाळगावे : डॉ रघुनाथ माशेलकर
मुंबई दि.११ :- सुविद्य, सुसंस्कृत व जातीविरहित भारत निर्माण करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी बाळगावे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले. हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मुंबईत के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
भारत संचार निगममधील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात १५ टक्के वाढ करण्याचे आश्वासन
एचएसएनसी विद्यापीठाचे डॉ. निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक एम एन जस्टीन, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच स्नातक यावेळी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महापालिका ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ प्रदान
विद्यार्थ्यांनी नवसंशोधन, उद्यमशीलता यांना उत्तम चारित्र्याची जोड देऊन देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले. राज्यपालांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील १५ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदक तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.