पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी विशेष चौकशी समिती
मुंबई दि.११ :- रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही समिती स्थापन करण्याचे आदेश फडणवीस यांनी म्हटले आहे.
सुसंस्कृत आणि जातीविरहित भारत निर्माण करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी बाळगावे : डॉ रघुनाथ माशेलकर
दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली आहे.