भारत संचार निगममधील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात १५ टक्के वाढ करण्याचे आश्वासन
नवी दिल्ली दि.११ :- भारत संचार निगममधील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात १५ टक्के वाढ करण्याचे आश्वासन दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय दूरसंचार पेन्शर्स संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) शिष्टमंडळाला दिले.
बृहन्मुंबई महापालिका ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ प्रदान
भारतीय दूरसंचार पेन्शर्स संघाचे पदाधिकारी आणि अश्विनी वैष्णव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वैष्णव यांनी हे आश्वासन दिले. भारत संचार निगममधील सुमारे तीन लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिष्टमंडळात महामंत्री हरी सोवनी, धरमराज सिंग, आर सी पांडे व्ही व्ही सत्यनारायणा, गिरीश आर्या यांचा समावेश होता. भारत संचार निगमधील कर्मचाऱ्यांना महानगर टेलिफोन निगम मर्यादितमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती वेतन मिळावे यासाठी भारतीय दूरसंचार पेन्शर्स संघाकडून गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.