मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.११ :- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या (१२ फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन पाचव्या – सहाव्या मार्गिकेवर सकाळी ११ ते दुपारी ३.३० या वेळेत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- कुर्ला येथे येणाऱ्या मेल – एक्स्प्रेस कल्याण – ठाणेदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश
हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल, बेलापूरकरिता हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.
राज्यपाल ‘निक्षय मित्र’ झाले! – क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट
पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप – डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपरदरम्यान वाहतूक सुरू राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.