केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेतर्फे ऑनलाइन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.११ :- केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेने (सीडीएससीओ) देशातील सर्व ऑनलाइन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करून, विविध भ्रमणध्वनी अॅप्लिकेशन्ससह ऑनलाइन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून औषधांची मोठय़ा प्रमाणात विक्री करण्यात येत आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
याबाबत केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाअंतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेकडे अनेक तक्रारी आणि निवेदने आली होती. विविध न्यायालयांमध्ये औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याची विनंती करणारे खटले सुरू असून २०१८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवान्याशिवाय औषधांची ऑनलाइन विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश
तसेच पुढील आदेश येईपर्यंत ती तत्काळ रोखण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही देशामध्ये मोठय़ा प्रमाणात परवान्याशिवाय ऑनलाइन, इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून औषधांची विक्री, साठा किंवा प्रदर्शन किंवा वितरण हे प्रकार सुरू आहेत. नागरिक स्वत:च्या मर्जीनुसार औषध खरेदी करत असून नागरिकांना औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामळे केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाअंतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेने सर्व ऑनलाइन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.