अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई दि.११ :- अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
राज्यपाल ‘निक्षय मित्र’ झाले! – क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट
प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधले होते. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.