राज्यपाल ‘निक्षय मित्र’ झाले! – क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट
मुंबई दि.११ :- क्षयरोग निर्मुलनाच्या राष्ट्रीय कार्यात लोकसहभाग वाढावा, क्षयरोग रुग्णांना पोषण आहारासाठी मदत व्हावी यादृष्टीने सुरु झालेल्या ‘पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत अभियाना’ला प्रतिसाद दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट दिला.
सुसंस्कृत आणि जातीविरहित भारत निर्माण करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी बाळगावे : डॉ रघुनाथ माशेलकर
‘निक्षय मित्र’ या नात्याने आपण संबंधित क्षयरोग रुग्णाच्या पोषण आहाराची पुढील एक वर्षाकरिता जबाबदारी स्वीकारत असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले. क्षयरोग रुग्णांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार संचामध्ये कडधान्य, डाळी, तेल, दूध पावडर, अंडी, फळे व सुकामेवा यांचा समावेश आहे.
पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी विशेष चौकशी समिती
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सफल करण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्राने पुढे येऊन ‘निक्षय मित्र’ होण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. बृहन्मुंबईचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेश पाटील, राज्यपालांचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद शिंदे, डी व ई वॉर्ड क्षयरोग अधिकारी डॉ ओंकार तोडकरी, डॉ पृथ्वीराज राजोळे, शशांक बंडकर आदी उपस्थित होते.