बृहन्मुंबई महापालिका ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ प्रदान
मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महानगरपालिकेचे २०२१-२२ चे ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ ५० आदर्श शिक्षकांना मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुरुवारी प्रदान करण्यात आले. प्रत्येकी रुपये १० हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी
भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे, आमदार यामिनी जाधव, उपायुक्त (शिक्षण) केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपसंचालक (शिक्षण) संदीप संगवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोकुळ दुधाच्या किंमतीत आजपासून वाढ
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा असून शिक्षक उपलब्ध सर्व सुविधांचा फायदा घेऊन ज्ञानदान करतील, तेऐ विद्यार्थ्यांचे जीवन घडेल, असे प्रतिपादन अश्विनी भिडे यांनी केले.