‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी मालिकेत भूमिका साकारणार
मुंबई दि.०९ :- सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी आता या मालिकेत भूमिका साकारणार आहेत. टपाल कार्यालयाचे विभागीय अधिकारी या भूमिकेद्वारे गोस्वामी यांचा प्रवेश होणार आहे.
महापालिकेतर्फे मुंबईत आजपासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान
मालिकेतील पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये कॉम्प्युटर बसविण्यात आल्याचे दाखविले असून त्यामुळे काय धमाल घडते, ते मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका गुरुवार ते शनिवार रात्री नऊ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.