ब्लॉसम आंतरराष्ट्रीय शाळेतर्फे येत्या ११ फेब्रुवारीला डोंबिवलीत तृण धान्य आणि उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन
डोंबिवली दि.०९ :- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्यानिमित्ताने जनरल एज्युकेशन संस्थेच्या ब्लॉसम आंतरराष्ट्रीय शाळेतर्फे येत्या ११ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत तृण धान्य आणि उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आहे. ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी येथे दिली.
‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी मालिकेत भूमिका साकारणार
तृणधान्याची प्रत्येकाला ओळख व्हावी, या धान्याची शरीरासाठी प्रत्येकाला किती गरज आहे याची माहिती माहिती व्हावी, या उद्देशातून हे प्रदर्शन आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे,असेही डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले. २०१८ मध्ये देशात राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष राबविण्यात आले.
महापालिकेतर्फे मुंबईत आजपासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सरकारने तृणधान्यांचे महत्व ओळखून संयुक्त राष्ट्रसंघात तृणधान्य वर्ष जाहीर करावे म्हणून दोन वर्ष प्रयत्न केले. यंदाच्या वर्षी ‘युनो’ च्या पुढाकारामुळे जागतिक तृण धान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे, असेही डाॅ. कोल्हटकर म्हणाले.