ठळक बातम्या

महापालिकेतर्फे मुंबईत आजपासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान

मुंबई दि.०९ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ हे विशेष अभियान आजपासून राबविण्यात येणार आहे. या अभियानात सुमारे २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व आढावा घेण्याकरता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपलिका स्तरावर जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ‘आरोग्यम् कुटुंबम्’ कार्यक्रम

‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन डॉ. संजीवकुमार यांनी केले. या अभियानअंतर्गत, मुंबई शहर व उपनगर विभागातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, अपंग शाळा व अंधशाळा, अंगणवाड्या, बालगृहे / बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग, वसतिगृहे (मुले/मुली), खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये, तसेच शाळाबाह्य विद्यार्थी अशा ० ते १८ वर्षापर्यंतच्या २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *