मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य महायज्ञाचा शुभारंभ – ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीरे
मुंबई दि.०९ :- राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीरे, १ हजार ८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी इतक्या मोठ्या संख्येत राज्यात एकाच दिवशी ‘आरोग्याचा महायज्ञ’ पहिल्यांदाच होत आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेचा संपूर्ण राज्यात विस्तार करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांसाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
संसर्गजन्य आजारांवर संशोधन करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयोगशाळेची उभारणी
मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू होणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत “आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईलच, सोबतच त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.