बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ‘आरोग्यम् कुटुंबम्’ कार्यक्रम
मुंबई दि.०८ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ‘आरोग्यम् कुटुंबम्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत वस्ती पातळीवर पूर्व तपासणी, जनजागृती, निरोगी जीवनशैली, नवीन उपचार पद्धतींच्या धोरणांचा अवलंब, रुग्ण केंद्रित दक्षता आणि देखरेख प्रणाली या योजनांचा अवलंब करण्यात येणार आहे.
राज्याचा अर्थसंकल्प येत्या ९ मार्चला सादर होणार
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार मुंबईत प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे. महापालिकेने नुकत्याच केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘स्टेप्स सर्वेक्षणानुसार’ मुंबईतील ३४ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब, तर १८ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळून आला.
गाथा नवनाथांची मालिकेत आता ‘भर्तरीनाथ’ यांची जन्मकहाणी सुरू होणार
या कार्यक्रमांतर्गत शहरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने १६ रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह विशेष तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. त्याचा विस्तार सर्व रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेमार्फत आरोग्य स्वयंसेविका किंवा ‘आशा’ सेविका झोपडपट्टी आणि तत्सम वस्तीमधील प्रत्येक घरात जाऊन ३० वर्षांवरील व्यक्तींची उच्च रक्तदाबासंबंधी तपासणी करणार आहेत.