विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘वंदे मातरम्’ नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत वाजविणार
मुंबई दि.०८ :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी ‘वंदे मातरम्’ नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजविण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागल्यानंतरच निवडणूक चिन्हाविषयी निर्णय व्हावा- उद्धव ठाकरे
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बुधवारी झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राच्या राज्यगीतातील दोन कडवी वाजविण्यात येणार आहेत.
‘मुख्यमंत्री फेलोशिप’साठी अर्ज करण्याचे आवाहन
या दोन कडव्यांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधुत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे, वैशाली माडे यांनी ते गायले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र गीत येत्या १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. हे राज्यगीत १ मिनिट ४१ सेकंद गायले किंवा पोलिस बँडवर वाजविले जाणार आहे.