मुद्रांक निबंधकांकडून अनिल परब यांच्या विरोधात कारवाई सुरू- किरीट सोमय्या
मुंबई दि.०७ :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी मुद्रांक निबंधकांनी अनिल परबांविरोधात कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना
नोंदणी कायद्यांतर्गत खोटी माहिती देणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अनिल परबांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या लता मंगेशकर स्मारकाचे ताडदेव येथे भूमिपूजन
मुद्रांक निबंधकांनी परब यांना कलम ८२ अन्वये नोटीस बजाविली आहे. दरम्यान मुद्रांक कायदा कलम ३३ अन्वये वसुलीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे बोलले जाते. तसेच कलम ५९ अंतर्गत फौजदारी कारवाईही सुरू होणार असून हे संपूर्ण प्रकरण दापोली साई रिसॉर्टशी संबंधित आहे.