गुन्हे-वृत

मुंबईवर हल्ला करण्याची पुन्हा धमकी, इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नावाने धमकीचा दूरध्वनी

मुंबई दि.०७ :- मुंबईवर हल्ला करू, अशी धमकी पुन्हा एकदा देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे नावाने ही धमकी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा दूरध्वनी आला असल्याचे सांगितले जाते.

मुद्रांक निबंधकांकडून अनिल परब यांच्या विरोधात कारवाई सुरू- किरीट सोमय्या

धमकीच्या या दूरध्वनीनंतर विमानतळ परिसराची सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे सांगितले. त्याने मुंबईवर हल्ला करण्याचा इशारा दिला.

मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना

या फोनची माहिती विमानतळ व्यवस्थापनाने मुंबई पोलिसांना दिली. विमानतळाच्या सर्व एजन्सींनाही दक्ष करण्यात आले. पोलिसांनी विमानतळ परिसर आणि मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. असाच धमकीचा ई-मेल चार दिवसांपूर्वी ‘एनआयए’ला आला होता. तालिबानच्या नावाने ही धमकी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *