बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि.०७ :- प्रत्येकाला स्वतःचे, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घरे बांधावित, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एमसीएचआय- क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशनतर्फे ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या ( प्रॉपर्टी) प्रदर्शनास मुख्यमंत्री शिंदे यांनी काल भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईवर हल्ला करण्याची पुन्हा धमकी, इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नावाने धमकीचा दूरध्वनी
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, क्रेडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, बांधकाम व्यावसायिक व राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदि यावेळी उपस्थित होते. गृहनिर्माण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुण येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याची गरज लागणार असून राज्य शासन या व्यवसायासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल.
मुद्रांक निबंधकांकडून अनिल परब यांच्या विरोधात कारवाई सुरू- किरीट सोमय्या
करोना काळात ठाणे एमसीएचआयने ग्लोबल करोना रुग्णालय व इतर रुग्णालय उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमसीएचआयच्या गृहबांधणी क्षेत्राशी संबंधित प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व बांधकाम व्यावसयिक, वित्त पुरवठा कंपन्या एकाच ठिकाणी आल्यामुळे ग्राहकांना फायदा होणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आमदार सरनाईक, मैत्रीचे उपाध्यक्ष अशर, क्रेडाईचे अध्यक्ष मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले.