आरे वसाहतीतील आदिवासींचा उद्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुंबई दि.०५ :- जल, जंगल आणि जमीनीचे रक्षण आणि आदिवासींच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (६ फेब्रुवारी) मुंबईत आदिवासींचा मोर्चा काढण्यात येणार आहे. श्रमिक मुक्ती आंदोलन आणि महाराष्ट्र आदी आदिवासी मंच यांनी मोर्चा आयोजित केला आहे.
राजभवन येथील चित्रकला कार्यशाळेला राज्यपालांची भेट
मुंबईच्या आरे वसाहतीतील २७ पाड्यातील आदिवासी बांधव यात सहभागी होणार आहेत. आरेसह मुंबईतील अन्य पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. विविध प्रकल्पासाठी त्यांच्या शेतजमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. आरे कारशेड हे त्याचे ठळक उदाहरण आहे.
रायगड जिल्ह्यातील ४०० यशस्विता महिलांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवनात सत्कार
आदिवासींची घरे झोपडपट्टी घोषित करून त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारच्या योजनांचा लाभ घेताना आवश्यक ती प्रमाणपत्रे नसल्याने आदिवासींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या, सोमवारी दुपारी अकरा वाजता वांद्रे, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे.