राजभवन येथील चित्रकला कार्यशाळेला राज्यपालांची भेट
मुंबई दि.०५ :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी या कार्यशाळेला भेट दिली.
रायगड जिल्ह्यातील ४०० यशस्विता महिलांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवनात सत्कार
यावेळी राज्यपालांनी राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. जेजे स्कुल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून दुसरे अधिव्याख्याता शार्दूल कदम यांचेसह ते देखील कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.