बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.०४ :- बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पश्चिम रेल्वेकडून रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत रेल्वे रूळ देखभाल-दुरुस्तीसंबंधी कामे करण्यात येणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २ कोटी ७२ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त
ब्लॉक कालावधीत बोरिवली फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून लोकलची वाहतूक होणार नाही. धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत, काही बोरिवली लोकल गोरेगावपर्यंतच चालविण्यात येणार आहे तर काही फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.