बृहन्मुंबई महापालिकेची नाट्यगृहे आणिज लतरण तलावांच्या ठिकाणी आता पुस्तकांची विक्री
मुंबई दि.०४ :- वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे महापालिकेची चार नाट्यगृहे आणि पाच जलतरण तलावांच्या आवारात आता पुस्तकांची विक्री केली जाणार आहे. मराठी भाषा दिनापासून (२७ फेब्रुवारी) या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रकाशकांना सशुल्क जागा उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी महापालिकेने मराठी प्रकाशकांकडून अर्ज मागविले आहेत.
बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, भायखळ्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आणि मुलंडमधील कालिदास नाट्यगृहाच्या आवारात प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी सशुल्क जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २ कोटी ७२ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त
तसेच दादर, चेंबूर, कांदिवली, दहिसर पूर्व व अंधेरी पश्चिम येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावांच्या परिसरातही अशी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली.