ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २ कोटी ७२ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त
ठाणे दि.०३ :- ठाणे जिल्ह्यात २०२२ या वर्षांत २ कोटी ७२ लाख ४८ हजार २३३ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर ६८८ जणांविरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी उपयुक्त अर्थसंकल्प – डॉ. नरेंद्र जाधव
अंमली पदार्थाचे सेवन व वापर यांच्या संदर्भात परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मोराळे यांनी ही माहिती दिली. ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध भागात कारवाई केली.
तळमळीतूनच साहित्य आणि राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
यावेळी पोलिसांनी गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रॉन, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नशेच्या गोळ्या, कफ सिरफ, हेरॉईन, अफिम, केटामाइन आणि मॅथेक्युलिन असे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याचे मोराळे यांनी सांगितले. या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, जिल्हा शासकीय विभागाचे डाॅक्टर, पोलीस अधिकारी उपस्थित होते.